धावत ट्रेन पकडताना प्रफुल्लचा हात सुटला आणि...

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय.... आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय. 

Updated: Jan 22, 2018, 01:19 PM IST
धावत ट्रेन पकडताना प्रफुल्लचा हात सुटला आणि... title=

मुंबई : बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय.... आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय. 

बारायणमध्ये साकारली होती भूमिका

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण या मराठी चित्रपटात त्यानं भूमिका साकारली होती. तसंच झी मराठीच्या कुंकू  आणि तू माझा सांगाती या मालिकेतनंही प्रफुल्लनं भूमिका साकारल्या होत्या. 

घरी परतत असताना झाला मृत्यू

प्रफुल्ल सध्या मालाडमधल्या एका कंपनीत काम करत होता... तिथली नाईट शिफ्ट संपवून तो पहाटे घरी जात होता. तो मालाडहून पहाटे चार बाराची चर्चगेट लोकल पकडत होता. 

धावत लोकल पकडत असताना त्याचा हात सुटला आणि तो समोरच्या खांबावर आपटला, त्यातच त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.