भाऊबीजेनिमित्त लता मंगेशकरांनी सैनिकांना दिला खास संदेश!

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी भाऊबीजेनिमित्त भारतीय सैनिकांना खास संदेश दिला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 21, 2017, 06:23 PM IST
भाऊबीजेनिमित्त लता मंगेशकरांनी सैनिकांना दिला खास संदेश! title=

नवी दिल्ली : गानकोकीळा लता मंगेशकर यांनी भाऊबीजेनिमित्त भारतीय सैनिकांना खास संदेश दिला आहे. लता मंगेशकर यांनी शुक्रवारी रात्री फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्या म्हणतात, "भाऊबीजेनिमित्त मी प्रत्येक भारतीय सैनिकाला शुभेच्छा देते. मी देखील त्यांच्या बहिणीसारखीच असून मी त्यांच्यावर प्रेम करते. त्यांचा आदर करते. आपले सैनिक खुश राहोत आणि देव त्यांना दीर्घायुष्य देवो." त्याचबरोबर लता मंगेशकर यांनी भारतीय सैनिकांसाठी  'ऐ मेरे वतन के लोगों' हे गीत सादर केले. 

पुढे त्या म्हणाल्या, "आपल्या भारताचे एक रूप हे फक्त सैनिकांमुळे आहे. त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही. मी सैनिकांना विनंती करते की, जर त्यांना माझ्याकडून काही हवे असल्यास त्यांनी फक्त मला तसे सांगावे. मदतीसाठी मी नेहमीच तयार आहे."