आधारशी लिंक करा सिम पद्मावतीचं मिळवा फ्रि तिकीट

संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ सध्या वादात सापडल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आलंय.

Updated: Nov 22, 2017, 11:44 AM IST
आधारशी लिंक करा सिम पद्मावतीचं मिळवा फ्रि तिकीट title=

नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ सध्या वादात सापडल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आलंय.

आता हा सिनेमा कधी रिलीज होणार हे अजून स्पष्ट झालं नाहीये. पण हा सिनेमा बघण्याचा प्लॅन तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा सिनेमा मोफत बघण्याची संधी आहे. जेव्हाही हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तुम्ही हा सिनेमा मोफत बघू शकाल. पण यासाठी तुम्हाला तुमचं सिम आधारसोबत लिंक करावं लागेल.  

काय आहे ऑफर?

जर तुम्ही तुमचं सिम आधारसोबत लिंक केलं तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. आयडिया कंपनीने पेटीएमसोबत मिळून ही ऑफर आणली आहे. तुम्ही सिम आधारसोबत लिंक केल्यास तुम्हाला पेटीएम २५० रूपयांचं मुव्ही व्हाऊचर मिळेल. या व्हाऊचरचा वापर तुम्ही पेटीएमने पद्मावतीचं तिकीट बुक करण्यासाठी करू शकता.

ही आहे अट

आयडिया आणि पेटीएमच्या या ऑफर फायदा तेच यूजर्स घेऊ शकतात जे २४ नोव्हेंबरआधी आपलं सिम आधारसोबत लिंक करतील. ही ऑफर आयडियाने आपल्या प्रीपेड् आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना दिली आहे. कंपनीकडून मुव्ही व्हाऊचर २० हजार यूजर्सना दिलं जाणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचं सिम आधारसोबत लिंक कराल तेव्हा कंपनीकडून एक लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यात ज्यांचे नंबर येतील त्यांना ही मोफत सिनेमा बघण्याची संधी मिळेल. या यूजर्सना २९ नोव्हेंबरला मेसेजच्या माध्यमातून याची माहिती दिली जाईल.