मलायका अरोराने नाव बदलून केला मोठा खुलासा

सर्वांनाच मिळाला मोठा धक्का 

मलायका अरोराने नाव बदलून केला मोठा खुलासा  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्कृष्ठ डान्सर मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मात्र शनिवारी मलायकाने असं काही केलं ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्जुन कपूरसोबतच रिलेशनशिप आणि हा मोठा खुलासा यांच काही कनेक्शन आहे का? असा सवाल देखील विचारला जात आहे. 

तुम्हाला वाटत असेल की ही बातमी अर्जुन कपूरशी निगडीत आहे. तर तुम्ही चुकीचे आहेत. मलायकाला आजही तिच्या करिअरमधील सुरूवातीचा टप्पा खुणावत आहे. मलायका मॉडेलिंगची क्रेझी होती. मलायका अरोरा मॉडेलिंगच्या दिवसांना खूप मिस करत आहे. 

मलायका अरोराने खूप मोठा निर्णय घेतला आहे. अरबाज खानपासून वेगळं होऊन 2 वर्षे झाली. आता तिने खूप मोठा निर्णय घेतला आहे. मलायका अरोरा खानने सोशल मीडियावर मोठा बदल केला आहे. तिने आपल्या नावातून 'खान' हे नाव काढून टाकलं आहे. 

मलाइका अरोड़ा ने किया अपने प्यार का इजहार, अर्जुन के नाम का पेंडेंट पहने आईं नजर

मलायकाने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा मोठा बदल केला आहे. या बदलामुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तिच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुनच्या नावाची चर्चा झाली आहे. 

तिथेच मलायकाने आपल्या गळ्यात एक पेंडेट घालून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पेडेंटमध्ये AM अशा आद्याक्षर आहेत. मलायका अरोरा 2016 मध्ये अरबाज खानपासून वेगळी झाली असून 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 

गेल्या अनेक दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरलासोबत पाहिलं आहे. दीपवीर, प्रियंका आणि निकच्या लग्नानंतर मलायका आणि अर्जुन कपूर लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण आता ही चर्चा थांबली आहे. 

तसेच कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील अर्जुन कपूरला त्याच्या या नात्याबद्दल विचारणा केली. तसेच बहिण जान्हवी कपूरने देखील अर्जुनची त्याच्या या नात्यावरून मस्करी करताना दिसली. त्यामुळे आता हे दोघं सगळ्या चर्चा थांबवून नवीन नातं सुरू करणार याकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे.