त्रिशालाच्या बिकीनी फोटोवर सावत्र आई मान्यता दत्तने केली ही कमेंट...

संजय दत्त सध्या त्याच्या बायोपिक संजू मुळे चर्चेत आहे.

Updated: May 16, 2018, 01:03 PM IST
त्रिशालाच्या बिकीनी फोटोवर सावत्र आई मान्यता दत्तने केली ही कमेंट...

मुंबई : संजय दत्त सध्या त्याच्या बायोपिक संजू मुळे चर्चेत आहे. या सिनेमातून संजयच्या आयुष्यातील अनेक गुपितं उलघडतील. अलिकडेच संजय दत्तच्या मुलीने त्रिशालाने बिकीनी फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमुळे त्रिशाला सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

त्रिशालाच्या या फोटोवर तिची सावत्र आई मान्यता दत्तनेही कमेंट केली. मान्यताने फोटोवर हार्ट आणि किसची इमोजी पाठवली. मान्यता आणि त्रिशाला दोघींचेही बॉन्डिंग खूप चांगले आहे. दोघीही एकमेकींच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक, कमेंट करत असतात. काही दिवसांपूर्वी संजय दत्त प्रॉडक्शन त्रिशालाला लॉन्च करणार अशी चर्चा होती. पण ती अफवा ठरली.

 

I️ can’t wait for summer

A post shared by Trishala Dutt (@trishaladutt) on

त्रिशालाच्या बॉलिवूड पर्दापणाविषयी संजय दत्त म्हणाला की, मी माझ्या मुलीच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च केले आहेत. तिने फॉरेंसिक सायन्समध्ये स्पेशलायजेशन केले आहे. याशिवायही जर तिला सिनेसृष्टीत काम करायचे असेल तर तिला हिंदी भाषेवर मेहनत घ्यायला हवी. कारण इथे इंग्रजी काम करणार नाही. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close