अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केला साखरपुड्याचा फोटो

मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 

Updated: Aug 17, 2017, 04:51 PM IST
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केला साखरपुड्याचा फोटो title=

मुंबई : मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 

'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमातील तिची जाई ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्याही वाढलीये. अशातच प्रार्थनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आलीये.

प्रार्थनाने आपल्या साखरपुड्याचा फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. नुकताच तिचा दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत साखरपुडा झाला. आम्ही एकमेकांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने फोटो शेअर करताना म्हटलंय.

प्रार्थनाचा होणारा नवरा अभिषेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध वितरक आहे. त्याने डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम या सिनेमांची सहनिर्मिती केलीये. तसेच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केलय. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

 

We decided to be FOREVER ... #engaged #forlife #forevercommitted #lifepartner #myfiancé #happyme #godiskind # ....

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on