फास्टर फेणंचं पहिलं पोस्टर रिलीज

 रितेश देखमुख आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'फास्टर फेणे' या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता फास्टर फेणेच्या पहिल्या पोस्टरकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. 

Updated: Sep 19, 2017, 09:45 PM IST
फास्टर फेणंचं पहिलं पोस्टर रिलीज  title=

मुंबई :  रितेश देखमुख आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला 'फास्टर फेणे' या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता फास्टर फेणेच्या पहिल्या पोस्टरकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. 

 

 आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अमेय वाघ या चित्रपटात ' फास्टर फेणे'च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  या भूमिकेसाठी अमेयने वजनही कमी केले आहे. 
 
 फास्टर फेणे’हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजले होते.  बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. आता हे पात्र चित्रपटाच्या रूपात पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी फास्टर फेणे प्रदर्शित होणार आहे.