'माऊली' सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला

पाहा हा अफलातून टीझर 

'माऊली' सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला

मुंबई : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रितेश देशमुखच्या 'माऊली' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. रितेश देशमुखने 'लय भारी' या मराठी सिनेमात डेब्यू केला आहे. या सिनेमाचा सिक्वेन्स 'माऊली' सिनेमा आहे. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमधून पाहायला मिळते. 

शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमासाठी रितेश देशमुखने आपला 'माऊली' सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्याचं सांगितलं जात आहे. आता बॉक्स ऑफिसवर झिरो आणि माऊली या सिनेमाची टक्कर होणार नाही. 

 दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त आणि ऍक्शन आणि संवाद ऐकायला मिळत आहेत. या सिनेमात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. या सिनेमात रितेशसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

'माऊली' या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे तर निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या सिनेमाला अजय-अतुलच्या संगीताची साथ  मिळाली आहे.  १४ डिसेंबरला रितेशचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माऊली सिनेमातील पोलीस अधिकारी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close