कॉमेडिअन अदिती मित्तलवर महिलेचाच लैंगिक अत्याचाराचा आरोप

समोर आलं एक वेगळंच प्रकरण 

कॉमेडिअन अदिती मित्तलवर महिलेचाच लैंगिक अत्याचाराचा आरोप title=

मुंबई : #MeToo च्या अंतर्गत बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींची नाव लैंगिक अत्याचारामध्ये समोर आली. अनेक मोठ मोठ्या कलाकारांवर आरोप केल्याचं दिसत आहे. असं असताना एका महिलेनेच दुसऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. लोकप्रिय स्टँडअप कॉमेडिअन अदिति मित्तलवर दुसऱ्या एका कॉमेडिअन महिलेने कनीज सुरकाने जबरदस्ती किस केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत ट्विटरवर तिने माहिती दिली आहे. 

पण आता अशी माहिती मिळते की, अदिती मित्तलने या प्रकरणी कनीज सुरकाची माफी मागितली आहे. 2016 मधील एका कार्यक्रमात अदितीने कनीजला न विचारता किस केल्याप्रकरणी माफी मागितली आहे. अदितीने देखील या संदर्भात ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं आहे. अदितीने त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 2016 मध्ये भर कार्यक्रमात केलेलं किस हे त्या अॅक्टचा भाग होता. जोक निर्माण करण्यासाठी केलेली कृती होती. तसेच तिने म्हटलं की, या किसमध्ये कुठेही तिने आपल्या जिभेचा वापर केलेला नाही. 

तसेच पुढे अदिती म्हणाली की, तिने एका वर्षापूर्वीच या संदर्भात माफी मागितली आहे. मग आता पुन्हा एकदा #MeToo च्या चळवळी दरम्यान तिला याची आठवण कशी आले असा प्रश्न अदितीने विचारला आहे. 

10 ऑक्टोबरला कनीजने एक ट्विट शेअर केलं. त्यामध्ये तिने म्हटलं की, माझ्यासोबत जी घटना झाली त्याबद्दल मी बोलणं गरजेचं आहे. दोन वर्षांपूर्वी अंधेरी बेसवर जवळपास 100 लोकं आणि इतर कॉमेडिअन्ससमोर ही एक कॉमेडी शो होस्ट करत होत. यामध्ये अदिती मित्तल आपली सीट सोडून स्टेजवर येते आणि माझी परवानगी न घेता मला किस करते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप शॉकिंग आणि लाजास्पद होती. प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते आणि एक सीमा असते. माझ्या प्रकरणात अदितीने ती सीमा पार केली. एक वर्षाअगोदर मी हिम्मत करून अदितीला या घटनेबाबत सांगितलं. तेव्हा तिने सुरूवातीला माझी माफी मागितली मात्र त्यानंतर ती माझ्यावर हावी झाली ज्यामुळे मी खूप हर्ट झाल्याचं तिने सांगितलं आहे.