पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.

Updated: Jul 13, 2017, 06:49 PM IST
पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

पुणे : अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे. मुक्ताने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून नाट्यगृहातील अस्वच्छ शौचालयाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

मुक्ताने पोस्ट शेअर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग व्यक्त केलाय. पुण्यातील सगळ्याच नाट्यगृहांमध्ये हीच परिस्थिती आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या टेंडरवर सही राहिल्याने कर्मचारी नसल्याचं व्यवस्थापना कडून सांगण्यात येतं. त्यामुळे आम्ही जाब विचारायचा तरी कोणाला असा सवाल मुक्ता बर्वेने केला आहे.

मुक्ता बर्वेची फेसबूक पोस्ट