व्हायरल सॉंग 'इसमे तेरा घाटा' च्या 'त्या' मुलींच्या अटकेमागचं सत्य

या मुलींना पोलिसांनी अटक केल्याचेही वृत्त पसरले होते.

Updated: Jul 29, 2018, 02:26 PM IST
व्हायरल सॉंग 'इसमे तेरा घाटा' च्या 'त्या' मुलींच्या अटकेमागचं सत्य

मुंबई : अनेकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुकसोबतच आणखी एक अॅप दिसू लागलंय. याच नावं आहे म्युझिकली अॅप. प्रसिद्ध किंवा ऐकायला चांगले वाटणारे व्हिडिओ, गाणी, संवाद यावर आपण मिमिक्री करून ते सोशल मीडियात व्हायरल करण्याचा ट्रेंड सध्या वाढतोय. प्रत्येकजण म्युझिकली बनवून लाखो लाईक्स मिळविण्यामागे लागलायं. अशातच एक म्युझिकली व्हिडिओ खूप म्यूझिकली व्हिडिओ खूप चर्चेत आला. 'थोडीसी भी कोशीस न की तुने..इसमे तेरा घाटा..मेरा कुछ नही जाता..' या गाण्यावर चार मुलींनी हे म्युझिकली तयार केलं होतं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियात एकच वादंग उठला. या मुलींवर अनेकप्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या मुलींना पोलिसांनी अटक केल्याचेही वृत्त पसरले होते.  कोण म्हणतं या चौघी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर कोण म्हणत यातील एकीच्या भावाने त्यांच्या म्यूझिकलीमुळे आत्महत्या केली.

गाणं व्हायरल 

'इसमे तेरा घाटा' हे गाणं पहिल्यांदा १८ मे २०१८ ला युट्यूबवर अपलोड झालं. नायिकेने रिजेक्ट केल्यानंतर नायक खूप रागावतो पण तिला ब्लॅकमेल करण्याऐवजी समजदारी दाखवतो. मला काही फरक पडत नाही असे तिला सांगतानाचे गजेंद्र वर्माचे हे गाणं आहे.

मुलींना अटक ?

१४ सेकंदाच्या म्युझिकलीने हे गाणं पुन्हा खूप चर्चेत आलं. यामुळे गजेंद्र वर्मा प्रत्येक मोबाईलमध्ये पोहोचले. प्रत्येकजण या गाण्यावर म्युझिकली बनवून आपले लाईक्स आणि सबस्क्रायबर्स वाढवू लागला. दरम्यान गाण चुकीच्या पद्धतीने अभिनय करुन व्हायरल केल्याने त्या चार मुलींना अटक केल्याचे वृत्त पसरू लागले. हे वृत्त साफ खोटे होते.

इन्स्टावर फेमस

आपण जेव्हा हे आर्टीकल वाचत असाल तेव्हा लाल कपड्यातील ही मुलगी आणखी एक व्हिडिओ अपलोड करत असेल. ओनायजा राणा असे या मुलीचे नाव आहे. ती म्युझिकली आणि इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टावर ३० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close