नील नितिन मुकेशने चाहत्यांंसोबत शेअर केली गूड न्यूज

टेनिपटू सानिया मिर्झा, शाहीद कपूर त्यानंतर आता नील नितिन मुकेश याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची  बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Updated: Apr 24, 2018, 05:16 PM IST
नील नितिन मुकेशने चाहत्यांंसोबत शेअर केली गूड न्यूज  title=

मुंबई : टेनिपटू सानिया मिर्झा, शाहीद कपूर त्यानंतर आता नील नितिन मुकेश याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची  बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

न्यूज एजेन्सीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नील नितिन मुकेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी फार  भाग्यशाली आहे., परिवारातील सारीच मंडळी रुक्मिणीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आहे. तिने काय करायला पाहिजे काय नाही ? याकडे लक्ष ठेवून आहेत. 

मुलगा होणार की मुलगी याकडे मी फार लक्ष देत नाही. पण बाळाचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. 

रूक्मिणीच्या भावना 

रूकिमीने नीलचं कौतुक करताना तो उत्तम पती आहे पण त्यासोबतच चांगला पिताही होणार आहे अशी आशा व्यक्त केली. गेले काही दिवस आम्ही चांगलं बेबी शॉपिंग करत आहोत. या दरम्यान मेडिटेसहन,योगा, संगीत याकडे आम्ही विशेष लक्ष दिले आहे. 

सध्या नील प्रभाससोबत 'साहो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच दुबईतील चित्रपटाचं शेड्युल संपलं की तो भारतामध्ये परतणार आहे. लावकरच रुक्मिणीचं डोहाळे जेवणही होणार आहे.