नेहा स्वतःच घेत आहे तिच्याच नाववर मज्जा

बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर टिकटॉकवर सक्रिय....

Updated: Jan 9, 2019, 05:29 PM IST
नेहा स्वतःच घेत आहे तिच्याच नाववर मज्जा title=

मुंबई : सिंगिंग रियालिटी शो इंडीयन आयडॉल २००६ फेम, बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. नेहा तिच्या हसमुख स्वभामुळे चर्चेत राहते. आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला घायाळ करणारी नेहा आता टिकटॉक जॉइन करून स्वतःचे फनी व्हिडिओ पोस्ट करते आहे. आणि ते व्हिडिओ इंटरनेटवर  जबरदस्त व्हायरल होत आहेत. नेहा एवढ्यावरच थांबली नाही, तर स्वतःच्या ऑफिशियल इंन्स्टाग्राम अकाऊंटच्या टाइमलाइनवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती स्वतःचीच चेष्टा करताना दिसते आहे. ज्यामध्ये नेहाचे आडनाव बदलून नेहा नहाकर, नेहा रोकर, नेहा तैयार होकर अशा रीतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. याच फोटोला शेअर करत नेहा कक्कडने 'हाहाहा.... क्या क्रिएटिव लोग है' असे कॅप्शन दिले आहे. परंतु, नेहाने हे कॅप्शन सहजतेने दिले आहे. नेहाच्या या बदलत्या स्वभावामुळे ती चाहत्यांच्या पसंतीस उतरते आहे. नेहा ऑन स्क्रिन नेहमीच हसत खेळत असल्यामुळे चाहत्यांमध्ये ती दिवसागणिक अतिशय लोकप्रिय होते आहे. आणि तिच्या फँन्सची संख्याही वाढते आहे. 

या आधीही नेहाचा एक व्हिडिओ भलताचं व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नेहा सोनू निगमसोबत फोटोशूट करताना समोर आली होती. व्हिडिओ अतिशय मजेदार होता. काळ्या रंगाचा फोटोशूट गाऊन घालून नेहा फोटोशूट करत होती. फोटोशूटमध्ये नेहा अचानक तो गाऊन काढते. समोर चालू असलेला प्रकार पाहून सोनू निगम घाबरतो. नेहा कक्कड आणि सोनू निगम यांचा हा व्हिडिओ प्रचंड मजेशीर आहे.

दिल्लीची ही गायिका नेहा कक्कडला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. सिंगिंग रियालिटी शो इंडियन आयडॉलची ती परीक्षकही राहिली आहे. तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. यो यो हनी सिंगच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मखना' या गाण्याला नेहा कक्कडचा आवाज आहे.