video : कपिल शर्माच्या नव्या शोचा धमाकेदार प्रोमो

सहकलाकारांसोबत वाद आणि आरोग्याच्या काही समस्या यामुळे हिंदी टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग 'कपिल शर्मा' छोट्यापडद्यापासून दूर गेला होता. मात्र आता लवकरच कपिल शर्मा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे .

Updated: Feb 9, 2018, 07:28 PM IST
video :  कपिल शर्माच्या नव्या शोचा धमाकेदार प्रोमो

 मुंबई : सहकलाकारांसोबत वाद आणि आरोग्याच्या काही समस्या यामुळे हिंदी टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग 'कपिल शर्मा' छोट्यापडद्यापासून दूर गेला होता. मात्र आता लवकरच कपिल शर्मा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे .

  प्रोमो झाला रीलिज   

 कपिल पुन्हा कॉमेडी अंदाजामध्ये टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रोमोमध्ये कापिल एका रिक्षाचालकाला सोनि चॅनलला येणार का ? असं विचारतो. त्यावर नकार मिळाल्यानंतर कपिल त्याला त्याच्या खास अंदाजामध्ये 'बाबाजी का ठुल्लू' दाखवतो. 
 
 पहिल्यांदाच कपिल शर्मा त्याच्या शोच्या प्रोमोमध्ये एकटाच दिसत आहे. एरवी कपिलसोबत त्याचे सहकलाकारही दिसतात. मात्र मागील अनुभव पाहता  आता कपिल एकटाच प्रोमोमध्ये आला आहे.

 

 

 फ्लाईटमध्ये झाले भांडण   

 मागील वर्षी ऑस्ट्रेलियाहून परतताना कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये वाद झाला होता. यानंतर सुनीलने ' द कपिल शर्मा शो ..' हा कार्यक्रम सोडला. सुनील पाठोपाठ इतर कलाकारांनीही हा कार्यक्रम सोडला आहे. त्यानंतर टीआरपी खालावल्याने हा कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close