निक आणि प्रियंकाची अशी झाली पहिली ओळख

अशी झाली निक आणि प्रियंकाची पहिली ओळख

मुंबई : अमेरिकेतील गायक आणि अभिनेता निक जोनसने प्रियंका चोप्रासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. एका कार्यक्रमादरम्यान निकने प्रियंकासोबतच्या रिलेशनशिपबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच त्याने हे देखील सांगितलं की, प्रियंकाची आणि त्याची पहिली ओळख कशी झाली. आणि दोघं एकमेकांच्या कसे जवळ आले हे त्याने सांगितलं. 

'जोनस ब्रदर्स' ब्रंडचा सदस्य निकने 'द टुनाइट शो' मधील होस्ट जिमी फॉलनसोबत गप्पा मारताना आपल्या रिलेशनशीपमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, प्रियंका आणि निकची ओळख एका म्युचल फ्रेंडच्या माध्यमातून झाली. त्यानंतर ते दोघं एकमेकांच्या संपर्कात आले. निकने सांगितलं की, प्रियंका आणि निक यांच्या बोलण्याची सुरूवात टेक्स्ट मॅसेजमार्फत झाली. जवळपास 6 महिने हे दोघं एकमेकांशी मॅसेजच्या माध्यमातून बोलत होते. 6 महिन्यांनतर हे दोघेही संपर्कात आले. 

निकने पुढे सांगितलं की, मे 2017 मध्ये मेट गालात मी आणि प्रियंका फक्त रेड कार्पेटवर एकत्र चाललो. त्यानंतर मात्र आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कामानिमित्त भेटत राहिलो. काही आठवडे हे दोघं एकमेकांसोबत वेळ घावताना दिसले. आणि त्यांच्या रोमान्स सुरू असल्याच्या बातम्यांना उधाण आलं. निकने पुढे सांगितलं की, लोकांना असं वाटत होतं की, आम्हाला यासंबंधी बोलायचं नाही. पण आमचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. जवळपास 5 महिने आम्ही आमच्या नात्याला वेळ दिला. ही वेळ खूप कमी होती. पण त्यानंतर आम्ही लवकर निर्णय घेतला. आणि आम्हाला विश्वास होता की, आम्ही खूप योग्य निर्णय घेत आहोत. आम्ही आता खूप खूष आहोत. आणि लवकरच लग्नाचा निर्णय घेऊ. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close