प्रियकांचा होणारा पती निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

निकने अनेक गोष्टींचा केला खुलासा

Updated: Sep 9, 2018, 03:59 PM IST
प्रियकांचा होणारा पती निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाचा होणारा पती निक जोनसचा एक व्हिडिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. हॉलिवूडचा पॉप स्टार निक या व्हिडिओमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा सोबत साखरपुडा आणि त्याचं सेलिब्रिटी निकनेम 'प्रिक' बद्दल खुलासा करतांना दिसत आहे.

शुक्रवारी ‘द टुनाइट शो स्टारिंग जिमी फॅलनमध्ये निक जोनसला होस्ट जिमी फॉलनने त्याच्या आणि प्रियंकाबद्दलच्या अनेक गोष्टी विचारल्या. त्यावर निकने उत्तर दिली. या दरम्यान प्रियंका प्रेक्षकांमध्ये बसली होती.

फॉलनने रोका रुढीपंरपरेबद्दल विचारलं तेव्हा पॉप स्टार निकने म्हटलं की, रोका झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संबंधावर शिक्कामोर्तब होतो. निकने हा अनुभव अध्यात्मिक असल्याचं म्हटलं आहे. निकने शोमध्ये म्हटलं की, 'मला आणि प्रियंकाला कुटुंबासोबत वेळ घालवून खूप छान वाटलं. हा क्षण खासजी होता. पण आम्ही जगाला नंतर याबद्दल सांगितलं.'

मित्रांनी करुन दिली ओळख

निकने म्हटलं की, 'तो आणि प्रियंका एक म्युच्यूअल फ्रेंड होते. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. सुरुवातीला टेक्स्ट मॅसेजच्या माध्यमातून बोलणं होत होतं त्यानंतर 6 महिन्यांनी पहिल्यांदा भेटलो.'

निक म्हणतो की, 'मे 2017 मध्ये मेट गालामध्ये दोघेही फक्त मित्र म्हणून रेड कार्पेटवर चालले होते. यानंतर आमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आमची भेट होत होती.' काही दिवसानंतर जेव्हा दोघेही अनेकदा एकत्र दिसू लागले तेव्हा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.

जेव्हा प्रपोज केलं...

निकने प्रियंकाला प्रपोज केलं. त्याच्या मते ती त्याच्यासाठी परफेक्ट होती. 5 महिन्याआधीच त्यांनी आपल्या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला. 

'प्रिक' निकनेम आवडलं

शोच्या होस्टने जेव्हा निकला विचारलं की तु निकनेम बद्दल काही विचार केला आहे का तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रियकांने जोरात म्हटलं की, 'प्रिक'. निकने म्हटलं की, प्रियंकाला प्रिक आवडतं. मला ते इतकं पसंद नाही.