पद्मावती चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला दिवसेंदिवस विरोध वाढत  आहे.

Updated: Nov 19, 2017, 03:34 PM IST
पद्मावती चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली  title=

मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला दिवसेंदिवस विरोध वाढत  आहे.

करणी सेनेने या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यानुसार हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. तसेच १ डिसेंबरला करणी सेनेकडून भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. 

वायोकॉम १८ च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 'पद्मावती' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता नेमका कधी रिलीज होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नसली तरीही वाद निवळल्यानंतर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येईल अशी माहिती देण्यात आली आहे.  पद्मावती चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार होता.

काय आहे आक्षेप ? 

चित्रपटामध्ये ' राणी पद्मावती'चे चुकीचे स्वरूपात  चित्रण करण्यात आले आहे. तसेच इतिहासातील काही संबंध बदलल्याचा म्हणत काही रजपूत संघटनांनी पद्मावतीला तीव्र विरोध दर्शवला आहे.  चित्रपट आम्हांला दाखवल्याशिवाय रिलीज करू नये तसेच तो रिलीज झाल्यास सिनेमागृहांचे नुकसान होईल असा धमकी वजा इशारा देण्यात आला होता. 

पद्मावती चित्रपटामध्ये शाहीद कपूर, रणवीर सिंग सह  अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत झळकत आहे.