घटस्फोटानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची सचिन-जूहीला मोठी मदत

टेलिव्हीजन वरील लोकप्रिय जोडी जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा गेल्या महिन्यातच घटस्फोट झाला.

Updated: Jul 17, 2018, 10:21 AM IST
घटस्फोटानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची सचिन-जूहीला मोठी मदत title=

मुंबई : टेलिव्हीजन वरील लोकप्रिय जोडी जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा गेल्या महिन्यातच घटस्फोट झाला. लग्नाच्या ९ वर्षांनंतर दोघेही विभक्त झाले. घटस्फोटानंतर सुमारे महिन्याभरानंतर अभिनेता सचिन श्रॉफने अखेर मौन सोडले आणि आपल्या नात्याबद्दल खुलासा केला.

घटस्फोटच्या महिन्याभरानंतर सोडले मौन

सचिन श्रॉफने सांगितले की, बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने त्यांच्या घटस्फोटात मध्यस्थी केली. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांची मुलगी समायराची फक्त काळजीच घेतली नाही तर अमेरिकेत तिच्या शिक्षणाचीही सोय केली. बिग बॉस ५ च्या दरम्यान पूजा बेदी आणि जुही परमार यांच्यात घट्ट मैत्री झाली.

घटस्फोटच्या महिन्याभरानंतर एका मुलाखतीत सचिनने सांगितले की, जूहीने कधीच त्याच्यावर प्रेम केले नाही. आमचा घटस्फोट सहमतीने झाला असून एकतर्फी नाते नेहमीच वाईट असते. मी असे काहीच नाही केले ज्यामुळे जूही माझ्यावर प्रेम करेल.

पुढे तो म्हणाला की, पूजा बेदीने आमची मुलगी समायराचे भविष्य सुरक्षित करण्यात खूप मदत केली. जूहीच्या अपेक्षेपेक्षा अधिक मी समायरासाठी दिले आहे. दोन बेडरुम असलेल्या अपार्टमेंटचा अर्धा हिस्सा आणि पुण्यातील प्रॉपर्टीही मुलीच्या नावे केली आहे.

तर जूही म्हणते...

यापूर्वी जूहीने सांगितले होते की, मुलगी वडीलांची आठवण काढत नाही. आमच्य़ा आयुष्यात काय होत आहे, हे समजण्यास ती अजून खूप लहान आहे. सचिन अनेकदा घरी नसायचे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची तिला सवय आहे. अनेकदा तर ती वडीलांविषयी विचारत देखील नाही.