लवकरच धमाका करणार ही ‘कमांडो’ची अभिनेत्री, बघा फोटो

अभिनेत्री पूजा चोप्रा ही सिद्धार्थ मल्होत्रा आणि नीरज पांडेसोबत ‘ऎयारी’ या सिनेमात काम करण्यासाठी फारच उत्सुकत झाली आहे. ‘ऎयारी’ हा एक सत्यघटनेवर आधारित सिनेमा असून भारतीय सेनेच्या दोन अधिका-यांच्या अवतीभवती फिरणारी कथा आहे.

Updated: Sep 20, 2017, 03:51 PM IST
लवकरच धमाका करणार ही ‘कमांडो’ची अभिनेत्री, बघा फोटो title=

नवी दिल्ली : अभिनेत्री पूजा चोप्रा ही सिद्धार्थ मल्होत्रा आणि नीरज पांडेसोबत ‘ऎयारी’ या सिनेमात काम करण्यासाठी फारच उत्सुकत झाली आहे. ‘ऎयारी’ हा एक सत्यघटनेवर आधारित सिनेमा असून भारतीय सेनेच्या दोन अधिका-यांच्या अवतीभवती फिरणारी कथा आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा यात सेनेचा अधिकारी दाखवला असून मनोज वाजपेयी यांचीही महत्वाची भूमिका आहे. 

Pooja chopra

Pooja chopra

पूजाने सांगितले की, ‘सध्याच मी या सिनेमातील माझ्या भूमिकेबद्दल जास्त खुलासा करू शकत नाही. मी इतकेच सांगू शकते की, मी खूप आनंदी आहे. नीरज पांडेसोबत काम करायला मिळत असल्याचा आनंद आहे. त्यासोबतच नसीरूद्दीन शहा, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि सिद्धार्थसारखे कलाकार यात आहेत’.

Pooja chopra

पूजाने याआधी ‘फॅशन’, ‘हिरोईन’, ‘कमांडो’ आणि नीरज पांडेच्या ‘आउच’ या शॉर्टफिल्ममध्ये काम केलंय. पूजा ही तिच्या फिट्नेससाठीही ओळखली जाते. ती सांगते, ‘मी आठवड्यातील केवळ पाच दिवस काम करते. यामुळे मला वजन आणि हृदयाच्या व्यायामाला मदत होते. मी दिवसा घराबाहेर व्यायाम करते. कारण मला जिमचा कंटाळा येतो’.