कमल हसनची मुलगी अक्षराचे मोबाईलमधले प्रायव्हेट फोटो लीक

अक्षरा हसनचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल

Updated: Nov 5, 2018, 04:04 PM IST
कमल हसनची मुलगी अक्षराचे मोबाईलमधले प्रायव्हेट फोटो लीक title=

मुंबई : सुपरस्टार कमल हसनची लहान मुलगी अक्षरा हसन सायबर क्राईमची शिकारी ठरली आहे. अक्षरा हसनचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. अक्षराचे हे फोटो फोनमधून लीक झाले होते. अक्षरा हसनने या प्रकरणात अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री अक्षरा हसनचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.+

हे फोटो इंटरनेटवर कसे लीक याबाबत अजून कोणताही खुलासा झालेला नाही. पण हॅकरने हे फोटो तिच्या मोबाईलमधून हॅक केल्याचं बोललं जातं आहे. अक्षराने देखील यावर अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कमल हसन किंवा बहिण श्रृती हसनकडून अजून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.

अक्षराकडून यावर कोणत्याही कायदेशीर कारवाईबाबात स्पष्टीकरण आलेलं नाही. याआधी अॅमी जॅक्सनचे खासगी फोटो देखील लीक झाले होते. अक्षरा हसनने 2015 मध्ये शमिताभ सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि धनुष मुख्य भूमिकेत होते.