"आम्ही दोघी" सिनेमाचं पहिल पोस्टर लाँच

"आम्ही दोघी" या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं आहे. 

Dakshata Thasale | Updated: Dec 7, 2017, 01:31 PM IST
"आम्ही दोघी" सिनेमाचं पहिल पोस्टर लाँच

मुंबई : "आम्ही दोघी" या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं आहे. 

प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या दोन उत्कृष्ठ अभिनेत्रींचा अभिनय आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमांत काहीतरी वेगळं असणार याचा अंदाज पाहायला या पोस्टरमधून दर्शवला जात आहे. या पोस्टरमध्ये प्रिया बापटच कुर्त्यामध्ये एका नॉर्मल मॉर्डन लूकमध्ये दिसतेय तर मुक्ता बर्वे ही साडीमध्ये एका साध्या बाईच्या भूमिकेत दिसत आहे. तिने अतिशय साधी कॉटनची साडी नेसली असून तिचे केस बांधलेले आहेत. तिच्या गळ्यात केवळ काळा दोरा असून कपाळावर मोठाले कुंकू आहे आणि तिने हातात हिरव्या बांगड्या देखील घातल्या आहेत. दोघींच्या हातात बर्फाचा गोळा असून त्या दोघी बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत आहेत. 

कुणाचा आहे हा सिनेमा?

सिनेमा आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आम्ही दोघी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा सिनेमा १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून रसिकांना माहीत असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये उत्सुकता आहे.

या सिनेमातून तिच्याशी निगडीत असलेल्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात येत आहे. मुलगी, बहिण, नातं, पत्नी, आई आणि नंतर आजी अशा भूमिकांमधून एक स्त्री जात असते. तर या तिच्या आजूबाजूच्या घटनांवर सर्व गोष्टी अवलंबून आहे.