श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 03:17 PM IST
श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ title=

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

प्रिया प्रकाशचा व्हिडीओ व्हायरल

54 वर्षीय श्रीदेवीच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसलाय. श्रीदेवीला आज अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या अंत्यदर्शनासाठी एकीकडे मोठ्या प्रमाणात जनसामान्य़ तसेच कलाकारांची गर्दी होतेय. तर दुसरीकडे व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात श्रीदेवीसाठी ती एक गाणे गाताना प्रिया दिसतेय.

 

हा व्हिडीओ फॅन क्लब प्रिया प्रकाश वारियरच्या नावाने ट्विटर अकाऊंट युझरने शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय, इतिहास कधीच अलविदा म्हणत नाही, 'इतिहास कभी भी अलविदा नहीं कहता, इतिहास कहता है कि जल्द ही मिलेंगे'. 

प्रियाने म्हटलंय हे गाणं

या व्हिडीओत प्रियाने कभी अलविदा ना केहना हे गाणं म्हटलंय. श्रीदेवी यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांना बॉलीवूडची सुपरस्टार असं म्हटलं जायचं.