हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2018, 07:27 PM IST
हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन

मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

एव्हाना सर्व तरुणांच्या डिपी, स्टेटसमध्ये 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी प्रिया आणि तिचा व्हिडिओ दिसू लागलायं.

सनी लियॉनीला टाकलं मागे

गुगल सर्च ट्रेंडमध्ये प्रियाने सनी लियॉनी, कॅटरिना, आलिया, दिपिका यांनाही मागे टाकले आहे. यावरून तिच्या क्रेझचा अंदाज आपण लावू शकतो. या प्रियाचा 'व्हॅलेंटाईन' कसा असणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. प्रियाने या प्रश्नांना उत्तरही दिले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कोण आहे प्रिया वॉरिअर?

प्रिया अवघी १८ वर्षांची असून केरळमधील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम सिनेमातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप याच गाण्यातील आहे.

'हिंदुस्थान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या 'व्हॅलेंटाईन डे' बद्दल सुरू असलेल्या गॉसीप्सचा खुलासा केलाय.

अजून तरी कोणी तसा 'स्पेशल वन' नसल्याचे तिने सांगितले. व्हॅलेंटाईनच्या दिवशी ती आपल्या कामात व्यस्त असणार असल्याचेही ती म्हणाली.

अभ्यास आणि अभिनय या दोन गोष्टी सध्या माझ्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे तिने सांगितले आहे. 

त्यामूळे 'व्हॅलेंटाईन डे' च्या चर्चांना पूर्णविराम मिळालायं.

प्रिया लोकप्रियतेने खुश

प्रियाला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाने नक्कीच आनंद झाला असेल. मात्र तिच्या कुटुंबियांना चांगलाच मनस्ताप होतो आहे. प्रियाने चाहत्यांच्या प्रेमावर आनंदही व्यक्त केलाय.

काय म्हणाली प्रियाची आई?

thenewsminute.com या वेबसाईटसोबत बोलताना प्रियाची आई प्रीथा यांनी चिंता व्यक्त केलीये. प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तिला होस्टेलवर पाठवण्यात आल्याचे तिच्या आईने सांगितले.

होस्टेलवर का पाठवले? असा प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या की, एका रात्रीत प्रियाला मिळालेली लोकप्रीयता बघून मी घाबरले. दिग्दर्शकाने सिनेमाच्या रिलीजपूर्वी प्रियाला कुठलीही मुलाखत न देण्याचे बजावले आहे. सिनेमाचे काहीच सीन्स शूट झाले आहेत.

त्याआधीच प्रिया इतकी लोकप्रिय झालेली पाहून मी तिला होस्टेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

पहिला सिनेमा

इंटरनेटवर चर्चेत असलेली प्रिया प्रकाश वॉरियर एका दिवसात प्रसिद्ध झाली आहे. १८ वर्षांची प्रिया वॉरियर एका मल्याळी सिनेमाची अभिनेत्री आहे. 'Oru Adaar Love' असं या सिनेमाचं नाव आहे.
 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close