मी एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते - प्रियंका चोप्रा

प्रियंकाच्या रिलेशनशीप स्टेटसची आतापर्यंत कधीच चर्चा झाली नाही, मात्र आता खुद्द तिनेच मौन सोडलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 10, 2018, 07:11 PM IST
मी एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते - प्रियंका चोप्रा title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. प्रियंकाच्या रिलेशनशीप स्टेटसची आतापर्यंत कधीच चर्चा झाली नाही, मात्र आता खुद्द तिनेच मौन सोडलं आहे. 

गेल्या वर्षभरापासून मी सिंगल

मी एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते, मात्र गेल्या वर्षभरापासून मी सिंगल आहे, असा खुलासा प्रियंकाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. प्रियंकाच्या आयुष्यात नेमकं कोण होतं यावरुन आता तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

रिलेशनशीपविषयी कबुली दिलेली नाही

प्रियंका चोप्रा बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही नेहमीच चर्चेत असते. प्रियंका चोप्राने आतापर्यंत तिच्या रिलेशनशीपविषयी कोणतीही कबुली दिलेली नाही. मात्र आता तिने मौन सोडलं असलं तरी नावंही स्पष्ट केलेलं नाही. यामुळे प्रियंका कुणाच्या रिलेशनशीपमध्ये होती हा देखील चर्चेचा विषय आहे.