...म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !

'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 05:11 PM IST
...म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !

मुंबई : 'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडच्या टॉप १० मध्ये  आपले नाव समाविष्ट केले आहे. विद्याचे चित्रपट आणि तिचा अभिनय काहीसा वेगळ्या ढंगाचा असून तिचा खास असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र एककाळ असा होता ज्यावेळी निर्माते तिला चित्रपटात घेण्यास नकार देत असतं. तिचा पायगुण वाईट असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. 

विद्याने सुरुवातीला अनेक बंगाली चित्रपटात काम केले पण ते काही कारणास्तव प्रदर्शित झाले नाहीत. त्यानंतर विद्या ज्या चित्रपटात काम करेल त्याचे नुकसान होत असे. त्यामुळे विद्या असेल तिथे नुकसान, असा गैरसमज निर्माण झाला. काम मिळवण्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याचबरोबर तिने अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. पण तिला सगळीकडून नकारघंटाच ऐकू आली. परंतु, स्वभावाने जिद्दी असलेल्या विद्याने हार न मॅनटा आपले प्रयत्न सातत्याने चालूच ठेवले. 

परिणिता चित्रपटासाठी अनेक वेळा तिला स्क्रिन टेस्ट द्यावी लागली, असे विद्या सांगते. मात्र एकदा निर्मात्याने चक्क तिची जन्मपत्रिका मागितली तेव्हा तर हद्दच झाली. त्यानंतर विद्याला देखील आपला पायगुण चांगला नसल्याचे वाटू लागले. परंतु, वेळेसोबत नशीबही बदलले. 
मिळालेल्या संधीचे सोने करत तिने अनेकांची मने जिंकली. 

परिणिता, कहानी, कहानी 2 आणि द डर्टी पिक्चरसारख्या चित्रपटांनी विद्याचे आयुष्यच बदलून टाकले. तसेच विद्याला एक नवी ओळख मिळवून दिली. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'बेगम जान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. मात्र त्यातील विद्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. सध्या विद्या आपला आगामी चित्रपट ‘तुम्हारी सुलू'मध्ये व्यस्त आहे. नुकतेच ‘तुम्हारी सुलू'चे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.