पंजाबी गायकाची गोळ्या घालून हत्या, जंगलात सापडला मृतदेह

जंगलामध्ये सापडला पंजाबी गायकाचा मृतदेह

Updated: May 28, 2018, 01:53 PM IST
पंजाबी गायकाची गोळ्या घालून हत्या, जंगलात सापडला मृतदेह title=

नवी दिल्ली : पंजाबच्या मोहालीमधून सध्या एक धक्कादायक बातमी येत आहे. पंजाबी गायक नवजोत सिंग यांची हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह मोहालीच्या जंगलामध्ये सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या शरीरावर 4 ते 5 गोळ्या लागल्या आहेत. गोळ्या लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोहाली पोलिसांना जंगलामध्ये एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. जेव्हा तपास केला तेव्हा कळालं की हा मृतदेह पंजाबी गायक नवजोत सिंग यांचा आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून यामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरु आहे.