'रागिनी एमएमएस रिटर्न्स' फेम अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

तिचा बोल्ड फोटो शूटचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Nov 10, 2017, 07:23 PM IST
'रागिनी एमएमएस रिटर्न्स' फेम अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : टेलीव्हिजन अभिनेत्री करिश्मा शर्मा पुन्हा चर्चेत आली आहे. पवित्र रिश्ता, यह है मोहबत्ते या सिरिअल्समधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. 

 त्यानंतर रागिनी एमएमएस रिटर्न्स मध्ये ती रागिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील तिच्या भूमिकेची सगळीकडे चर्चा होत आहे.

जेव्हापासून तिच्या या कॅरेक्टरची घोषणा झाली तेव्हापासून तिने स्वत:चा बोल्ड अंदाज दाखवायला सुरूवात केली आहे. 

सनी लिओनीमूळे रागिनी एमएमएसची सिरिज चर्चेत राहिली. त्यानंतर आता करिश्माकडे हे आव्हान असणार आहे.

या फोटोशूटमध्ये ती बॅकलेस दिसत असून ती खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. 

 

Caption this  Shot by @amitkhannaphotography MuH @makeupbyanshu Styled by @prashantmangasuli

A post shared by Ragini (@karishmasharma22) on

याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. २३ वर्षाच्या करिश्माने टेलिव्हिजनवर खूप मोठा धमाका केला नसला तरी तिला याचा काही फरक पडत नाही. 

आपल्या फॅन्सच्या कॉंटॅक्टमध्ये राहण्यासाठी ती सोशल मीडियाचा पूरेपूर फायदा करुन घेत आहे. 

सध्या तिचा बोल्ड फोटो शूटचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close