रजनीकांत यांचा #MeToo ला पाठिंबा, पण महिलांनाही केलं आवाहन

महिलांना ही केलं असं आवाहन

Updated: Oct 20, 2018, 04:47 PM IST
रजनीकांत यांचा #MeToo ला पाठिंबा, पण महिलांनाही केलं आवाहन title=

मुंबई : देशभरात सध्या #MeToo चळवळीने एकच खळबळ उडवून दिली आहे. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर गैरवर्तवणुकीचे आरोप केल्यानंतर आता आणखी प्रसिद्ध व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींवर आरोप होण्यास सुरुवात झाल्याने हे प्रकरण आता आणखी गंभीर होत चाललं आहे. बॉलिवूडमध्ये तनुश्रीच्या आरोपानंतर 2 गट पडले आहेत. यातच आता दक्षिणातील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

#MeToo चळवळीला आपला पाठिंबा असल्याचे रजनीकांती यांनी चेन्नईत पत्रकारांशी बोलताना म्हटलं. "#MeToo ही एक चांगली मोहीम असून महिलांनी या चळवळीच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी पण #MeToo चा गैरवापर करू नये." असं म्हटलं आहे.

वैरामुथू या प्रसिद्ध तामिळ गीतकारावर देखील महिलांनी आरोप केले आहेत. याबाबत रजनीकांत यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, 'वैरामुथू यांनी आरोप फेटाळले आहे. त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचं म्हटलं आहे.'