राखी सावंतने दीपकशी तोडलं नातं, म्हणते, 'तुझ्या नादी लागून..'

'मी खूप वर्षे मेहनत केलीय. अशाप्रकारची कोणतीही घाणेरडी गोष्ट मला करायची नाही.'

Updated: Dec 6, 2018, 12:05 PM IST
राखी सावंतने दीपकशी तोडलं नातं, म्हणते, 'तुझ्या नादी लागून..'

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी लग्नाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. राखी सावंतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्न पत्रिका देखील शेअर केली होती. पण याला काही दिवस उलटले नसताना राखीने एक व्हिडिओ पोस्ट करत दीपक कलालवर आरोप केले आहेत. राखीने आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. दीपक आणि आपल्या नात्याविषयी ती प्रश्न उपस्थित करत आहे. मी त्याला ब्लॉक करेन असं ती या व्हिडिओमध्ये सांगतेय. 'दीपक मला माफ कर, माझा परिवार माझ्यावर खूप नाराज आहेत. जे काही झालं ते त्यांना अजिबात आवडलेलं नाहीय. 14-15 वर्षांपासून मी फिल्म इंडस्ट्रीत आहे. मी खूप वर्षे मेहनत केलीय. अशाप्रकारची कोणतीही घाणेरडी गोष्ट मला करायची नाही.'

'मी साधी सरळ मुलगी'

Image result for rakhi sawant and deepak kalal zee news

'मी माझ्या परिवाराला संभाळतेय त्यामुळे मला अशी वाईट पब्लिसिटी नकोय.

लोक मला शिव्या देतायत आणि वाईट बोलतायत. मी अस कधी केलं नाहीय.मी खूप साधी सरळ आणि देवावर विश्वास ठेवणारी आहे.' असं ती पुढे म्हणाली. राखी सावंतच्या या व्हिडिओवर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. राखीच्या या व्हिडिओला देखील तिचा पब्लीसिटी स्टंट म्हटलं जातंय. 

 

Image result for rakhi sawant and deepak kalal zee news

तुम्हाला माहित असेल राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी एकत्र येऊन आपण 31 डिसेंबरला लॉस एंजेलसमध्ये लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Image result for rakhi sawant and deepak kalal zee news

त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वांची घोषणा केली आणि मध्येच एकमेकांना शिव्याही दिल्या. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close