राणा दा 'किसान अभिमान अॅप'चा ब्रँड अम्बॅसेडर

राणा दा चा नवा उपक्रम 

राणा दा 'किसान अभिमान अॅप'चा ब्रँड अम्बॅसेडर  title=

मुंबई : मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवीन कार्यक्रम देणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या, आपल्या लाडक्या 'झी मराठी' वाहिनीने  स्वात्रंत्र्यदिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आणली आहे एक विशेष भेट, ‘किसान अभिमान अॅप’.

ह्या अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळेल त्यांच्या हक्काच बाजाराचं व्यासपीठ आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल एका क्लीकवर उपलब्ध होईल विकत घेणाऱ्या उपभोक्त्यांसाठीही, संपूर्ण कृषिक्षेत्र आणि त्या संबंधित समुदायाला एकाच डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणणं हा या किसान अभिमान अॅपचा मूळ उद्देश. 'शेतकरी, ग्राहक, घाऊक विक्रेता' या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘झी मराठी’ प्रस्तुत ‘किसान अभिमान अॅप’. या अॅपच्या माध्यमातून विक्रेता आणि खरेदीदार एकमेकांशी थेट संपर्क साधू शकतील.

वापरण्यास सोपं असलेले हे अॅप तब्बल १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी बांधवाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी  एकरूप करणं आणि संपूर्ण कृषिक्षेत्राचा विकास हे या किसान अभिमान अॅप चं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे. किसान अभिमान अॅपचा ब्रँड अम्बॅसेडर असणार आहे आपला सर्वांचा लाडका 'राणादा'. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांनो झी मराठी ‘किसान अभिमान अॅप’ जरूर डाउनलोड करा.