'या' व्यक्तीसाठी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार

अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील हीट जोडीपैकी एक आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. वेगळे झाल्यानंतरही त्यांनी 'तामशा' हा चित्रपट केला होता. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.  

Updated: Apr 4, 2018, 08:47 AM IST
'या' व्यक्तीसाठी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील हीट जोडीपैकी एक आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. वेगळे झाल्यानंतरही त्यांनी 'तामशा' हा चित्रपट केला होता. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.  

खास आहे प्रोजेक्ट 

'तमाशा' चित्रपटानंतर आता तब्बल तीन वर्षांनी पुन्हा दीपिका आणि रणबीर कपूर एकत्र येणार आहेत.  कोणत्याही चरित्रपटासाठी नव्हे तर अपकमिंग फॅशन शोमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसणार आहे. 

मनीष मल्होत्रासाठी एकत्र  

मनीष मल्होत्राच्या कलेक्शनसाठी दीपिका आणि रणबीर एकत्र रॅम्पवॉकवर उतरणार आहेत. 9 एप्रिलला होणार्‍या मिजवान फॅशन वीकमध्ये मनीष  मल्होत्राने डिझाईन केलेले ड्रेस घालून दोघे एकत्र येणार आहेत. यासाठी दीपिका आणि रणबीर एकत्र तयारीदेखील करत आहेत. 

रणवीर सिंहसोबत बांधणार लग्नगाठ  

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचे कुटुंबियही लग्नाच्या तयारीला लागले आहे. विवाहसोहळ्यासाठी सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील 4 तारखा ठरवण्यात आल्या आहेत. मात्र यावर दीपिका-रणवीरने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. अलिकडेच दोघेही मालदीवजला व्हेकेशनसाठी गेले होते. त्यानंतरच या दोन्ही परिवाराने एकमेकांची भेट घेतली. तारखेसोबतच लग्नाचे ठिकाणही फायनल करण्यात आले आहे. विवाहसोहळ्यात नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळीच उपस्थित राहतील.