राणी मुखर्जी या चित्रपटातून करणार पुनरागमन

 राणी मुखर्जीने आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिल्वर स्क्रिनपासून दूरावलेली राणी मुखर्जी आता सिनेसृष्टीमध्ये पुन्हा येण्याच्या तयारीत आहे. 'हिचकी' या आगामी चित्रपटातून राणी पुनरागमन करणार आहे. 

Updated: Sep 12, 2017, 08:44 PM IST
राणी मुखर्जी या चित्रपटातून करणार पुनरागमन

मुंबई :  राणी मुखर्जीने आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिल्वर स्क्रिनपासून दूरावलेली राणी मुखर्जी आता सिनेसृष्टीमध्ये पुन्हा येण्याच्या तयारीत आहे. 'हिचकी' या आगामी चित्रपटातून राणी पुनरागमन करणार आहे. 
 
 मनीष शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दशित हिचकी हा सिनेमा बोलताना अडखळणार्‍या समस्येवर आधारित आहे. या चित्रपटाबाबत फारशी माहिती मीडियाला दिली नसली तरीही या चित्रपटाच्या पॅकअपनंतर राणीचा एक खास फोटो ट्विट करण्यात आला आहे. 
 

 फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने राणीचे फोटो शूट केले आहे. तिचा एक फोटो शेअर  करताना त्याने खास संदेशही लिहला आहे.  
 
 2014 साली 'मर्दानी' या चित्रपटात राणी मुखर्जीने एका धाडसी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. २०१५ साली राणी आणि आदित्य चोप्राच्या आयुष्यात एका गोंडस परीचे आगमन झाले. त्यानंतर राणी काही काळ सिनेमांपासून दूर राहिली. पण आता पुन्हा नव्या जोमाने ती पुनरागम करण्यास सज्ज झाली आहे.