माझ्यासाठी ही वेळ महत्त्वाची- रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंग सध्या सिम्बा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Mar 14, 2018, 08:32 AM IST
माझ्यासाठी ही वेळ महत्त्वाची- रणवीर सिंग

नवी दिल्ली : अभिनेता रणवीर सिंग सध्या सिम्बा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या पद्मावतमधील अभिनयाचेही चांगलेच कौतुक करण्यात आले होते. रविवारी हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्समध्ये रणवीर म्हणाला की, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला संजय लीला भन्साळी, जोया अख्तर, रोहीत शेट्टी आणि कबीर खान यांसारख्या सर्वश्रेष्ठ कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

ही वेळ महत्त्वाची

पुढे तो म्हणाला की, व्यक्ती म्हणून घडण्याची ही वेळ माझ्यासाठी महत्त्वाची  आहे. मला वेगवेगळ्या गोष्टी करण्याची संधी मिळत आहे. मला आव्हानात्मक भूमिका मिळत आहेत. मी माझ्या आगामी सिनेमांबद्दल अत्यंत उत्साही आहे. 

हे आहेत आगामी सिनेमे

त्याचबरोबर त्याच्या सिम्बा सिनेमाबद्दलही तो बोलला. संग्राम भालेराव उर्फ सिंबा. हा सिनेमा एका पोलिस अधिकाऱ्याचा आहे. रोहीत शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. त्याचबरोबर गली बॉय या सिनेमात रणवीर आलिया भट्टसोबत दिसेल.
याव्यतिरिक्त तो '83' या सिनेमाची तयारीही करत आहे. 

इंटरटेनर ऑफ द इयर

हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्समध्ये रणवीरला इंटरटेनर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.