पद्मावतच्या वादावर अखेर रणवीरने सोडलं मौन

करणी सेनेच्या विरोधामध्येच संजय लीला भंसाली यांचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला आहे. या वादावर इतक्या दिवस शांत असलेल्या रणवीर सिंग यांने देखील मौन सोडलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 25, 2018, 12:11 PM IST
पद्मावतच्या वादावर अखेर रणवीरने सोडलं मौन title=

मुंबई : करणी सेनेच्या विरोधामध्येच संजय लीला भंसाली यांचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला आहे. या वादावर इतक्या दिवस शांत असलेल्या रणवीर सिंग यांने देखील मौन सोडलं आहे.

पद्मावत सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमाविरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहे. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमातील कलाकार खूप आनंदीत आहे. सिनेमात सुल्तान अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणारा रणवीर सिंगने म्हटलं की, मला या सिनेमाचा भाग असल्याचा अभिमान आहे. संपूर्ण देश या सिनेमावर गर्व करेल असं देखील त्याने म्हटलं आहे.

रणवीरने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, मी आयमॅक्स थ्रीडीमध्ये पद्मावत पाहिला. मी सिनेमा पाहून इतका आनंदीत झालो की माझाकडे त्याबद्दल बोलायला शब्द नाही. मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो. मला माझा टीमवर गर्व आहे. संजय सरने मला या भूमिकेच्या रुपात मोठं गिफ्ट दिलं आहे. ज्यासाठी मी त्यांचा खूप ऋणी राहिलं.'

सिनेमाला चांगला प्रतिसाद आणि पंसती मिळत आहे. रणवीर सिंगच्या भूमिकेचं कौतूक होत आहे. यावर रणवीरने म्हटलं आहे की, ''माझी कामगिरी पाहून ज्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे मला खूप दिलासा मिळत आहे. यासाठी सर्वांचे खूप आभार.'

पुढे रणवीर म्हणतो की, 'आज मी सिनेमा रिलीज होत असतांनाच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आधीच शुभेच्छा देतो. सर्वांना सिनेमागृहात येण्याचं आमंत्रण देतो. मी या सिनेमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. सर्व देशाला या सिनेमाचा अभिमान वाटेल. जय हिंद'.