.. म्हणून कंगणा रणावतने आमीर खान, सलमान खानसोबतचे चित्रपट नाकारले

अमिताभ  बच्चन, सलमान खान, आमीर खान अशा सुपरस्टार्स सोबत आपणही स्क्रीन शेअर करावी हे अनेक नव्या अभिनेत्रींचे स्वप्न असते.

Updated: Sep 14, 2017, 07:54 PM IST
.. म्हणून कंगणा रणावतने आमीर खान, सलमान खानसोबतचे चित्रपट नाकारले

मुंबई : अमिताभ  बच्चन, सलमान खान, आमीर खान अशा सुपरस्टार्स सोबत आपणही स्क्रीन शेअर करावी हे अनेक नव्या अभिनेत्रींचे स्वप्न असते.

पण कंगना रणावत मात्र याला अपवाद आहे. कंगणाचं अभिनय कौशल्य आणि खुलं व्यक्तिमत्त्व यामुळेच तिच्या सिनेमांना रसिकांची,समिक्षकांची दाद मिळते.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ठग्स ऑफ़ हिन्दुस्तान' हा चित्रपट कॅटरिना कैफ आधी कंगणाला ऑफर करण्यात आला होता. पण या चित्रपटामध्ये आधीच अमिताभ बच्चन आणी आमीर खान असल्याने आपल्या वाट्याला फारसे काही नसेल असे कंगणाचे मत आहे. सलमान खानच्या 'सुल्तान'  चित्रपटासाठीदेखील कंगणाला ऑफर देण्यात आली होती. 

मूळातच ज्या चित्रपटात सुपरस्टार असतात त्या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्रींसाठी फारसा वाव  नसतो असे कंगणाचे मत आहे. त्यामुळेच कंगणा सुपरस्टार्ससोबतचे अनेक प्रोजेक्ट नाकारते. कंगणाचे चित्रपट स्टारडमपेक्षा तिच्या नावानेच अधिक चालतात.

येत्या शुक्रवारीही कंगणाचा 'सिमरन' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे. 'सिमरन' हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. यामध्ये कंगणा ‘प्रफुल पटेल’नावाच्या एका गुजराती मुलीची भूमिका साकारत आहे.