..म्हणून अभिनेत्री कविता लक्ष्मीवर आली डोसे विकण्याची वेळ

एकेकाळी 'स्त्रीधनम' या मल्याळम मालिकेतून प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या कविता लक्ष्मी या अभिनेत्रीला आता उदरनिर्वाहसाठी डोसे विकायची वेळ आली आहे. 

Updated: Oct 17, 2017, 10:42 AM IST
..म्हणून अभिनेत्री कविता लक्ष्मीवर आली डोसे विकण्याची वेळ  title=

 मुंबई : एकेकाळी 'स्त्रीधनम' या मल्याळम मालिकेतून प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या कविता लक्ष्मी या अभिनेत्रीला आता उदरनिर्वाहसाठी डोसे विकायची वेळ आली आहे. 
 कविताच्या एका चाहत्याने चित्रीत केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. ‘ओनमनोरमा’ वेबसाईटने कवितावर ही वेळ का आली ? याबाबतची माहिती दिली आहे.

 
 
 का आली कवितावर डोसे विकायची वेळ ? 
 काही वर्षांपूर्वी एका ट्रव्हल एजंसीने कविताच्या मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षण आणि नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या कामासाठी त्यांनी महिन्याला लाखभर रूपयांची मागणी केली होती. तेव्हा कविताला हे पैसे देणं शक्य होते. त्यानुसार वर्षभराची फी भरली. पण कालांतराने ही फसवणूक असल्याचे लक्षात आले. 
 
 कविता आर्थिक संकटांत अडकल्यानंतर चित्रपट निर्माता दिनेश पानिकर आणि मनोज वगळता कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. परिणामी कविताला रस्त्यावर डोसा विकावा लागत आहे. 
 
 'डोसे विकायला मला लाज वाटत नाही. पण मुलाच्या भविष्यासाठी मला हे करावे लागत आहे'. अशी भावना कविताने व्यक्त केली आहे.