''चला हवा येऊ द्या'' मंचावर संजय जाधवचा नवा अंदाज

मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो सगळ्यांच्याच आवडीचा आहे. या शोवर अनेक कलाकार आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी येतात. आता या शोमध्ये रेडू आणि लग्न मुबारक हे दोन सिनेमाचे कलाकार उपस्थित होते. या एपिसोडमध्ये चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी सिनेमाच्या कलाकारांच भन्नाट स्वागत केलं. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी पुन्हा एकदा आपली अनोखी कलाकृती सादर केली. 

या शो मध्ये दिग्दर्शक संजय जाधव आपल्या टीमसोबत आले होते. यावेळी कुशल बद्रिकेने संजय जाधव यांची अॅक्टिंग करून सगळ्यांनाच मनमुराद हसवलं. तसेच आदर्श शिंदे यांचे वडिल आणि लोकप्रिय गायक आनंद शिंदे  यांची देखील एन्ट्री झाली. या मंचावर भाऊ कदमने आपल्या अनोख्या अंदाजात गाणी गाऊन प्रेक्षकांना खूष केलं. माझा नवीन पोपट हा... या गाण्याचा नवा अंदाज या शोमध्ये पाहायला मिळाला. 

तसेच सौमित्र म्हणजे किशोर कदम यांची देखील अॅक्टिंग या मंचावर करण्यात आली. किशोर कदम यांच्या कविता अनोख्या अंदाजात सादर करण्यात आली. हा व्हिडिओ नक्की पाहा आणि खळखळून हसा... 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close