बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा

आता बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा झाली आहे.

Updated: Feb 10, 2018, 07:23 PM IST
बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा title=

मुंबई : 'पद्मावत' सिनेमातील दीपिकाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतयं. बिग बी अमिताभ बच्चन पासून जावेद अख्तर पर्यंत सगळ्यांनीच दीपिकाच्या कामाचं कौतुक केलं आहे. आता बॉलिवूडची उमरावजानही पद्मावतीवर फिदा झाली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन आणि आता एव्हरग्रीन रेखा

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या जणू 'सातवे आसमान पर' आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं बॉलिवूड इंडस्ट्रीत सेलिब्रिटींकडून चांगलच कौतुक होताना दिसतंय. एकेकाळी जे एकमेकांच्या प्रेमात होते, ज्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही तितकीच चवीनं चाखली जाते, त्या एव्हरग्रीन जोडीनं दीपिकाचं खास कौतुक केलंय. बिग बी अमिताभ बच्चन आणि आता एव्हरग्रीन रेखा. 

बिग बींनी दीपिकाला एक खास पुष्पगुच्छ पाठवला

दीपिकावर हे दोघंही अक्षरशा फिदा झाले आहेत. पद्मावत पाहिल्यानंतर बिग बींनी दीपिकाला एक खास पुष्पगुच्छ पाठवला आणि एक खास पत्रही लिहिलं. यात बिग बींनी पद्मावतमधल्या तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. 

महानायकाने एवढी मोठी शाबासकीची थाप दिली

आता खुद्द बॉलिवूडच्या महानायकाने एवढी मोठी शाबासकीची थाप दिली म्हटल्यावर दीपिकाचा आनंद आणि उत्साह दामदुपटीने वाढला असणार हे वेगळं सांगायला नको.  त्यानंतर आता बॉलिवूडच्या या मस्तानीला आणखी एका खास व्यक्तीकडून सरप्राईज गिफ्ट मिळालंय. 

अभिनेत्री रेखाकडूनही दीपिकावर कौतुकाचा वर्षाव

होय, अभिनेत्री रेखानेही दीपिकावर कौतुकाचा वर्षाव केलाय. एवढंच नाहीतर, दीपिकाला एक खास किमती भेटवस्तूही दिलीये. आता बॉलिवूडच्या या ''खुबसुरत'' अभिनेत्रीकडून अशा प्रकारे खास कौतुक झाल्यावर कोण नाही खूष होणार ? बिग बी अमिताभ असो की रेखा बॉलिवूडच्या दोन बिग सेलिब्रिटीजकडून अशा प्रकारे कौतुक झाल्याने दीपिकाची गाडी सध्या भलतीच खुष असणार. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाची वाहवाह

या आधीही अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष भेटून किंवा सोशल मीडियाच्या माध्यामातून दीपिकाच्या कामाची वाहवाह केली आहे. अगदी एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरच्या आई वडिलांनीही.

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्यासोबतच ज्येष्ठ लेखक गीतकार जावेद अख्तर यांनीही दीपिकाच्या कामाचं खुलेदिलाने कौतुक केलंय. एकूणच वादाच्या गर्तेत अडकलेल्या पद्मावत सिनेमाला तिकीट खिडकीवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र दीपिकाच्या  पडद्यावरील कामाची अनेकांनी आवर्जून दखल घेतली आहे.