सागर कारंडेने तिला लिहिलयं खास पत्र

आपल्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या गोष्टीचे महत्त्व मोठे असते मग ती पहिली गाडी असो वा इतर काहीही. आपले त्या गोष्टीशी अनोखे नाते निर्माण होते. भावनिकदृष्ट्या आपण त्या वस्तूशी जोडले जातो. 

Updated: Oct 20, 2017, 12:07 PM IST
सागर कारंडेने तिला लिहिलयं खास पत्र title=
सौजन्य - फेसबुक

मुंबई : आपल्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या गोष्टीचे महत्त्व मोठे असते मग ती पहिली गाडी असो वा इतर काहीही. आपले त्या गोष्टीशी अनोखे नाते निर्माण होते. भावनिकदृष्ट्या आपण त्या वस्तूशी जोडले जातो. 

चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेंने आपल्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या गाडीबद्दल भावनिक क्षण शेअर केलेत. चला हवा येऊ द्यामध्ये जसे पोस्टमन काका विविध विषयांवरील पत्रे सादर करतात त्याचप्रमाणे सागर कारंडेने गाडीला एक पत्र लिहिलेय. 

यात त्याने आपल्या पहिल्या गाडीबद्दल कसे ऋणानुबंध जुळले. तिच्या आठवणी मनात कशा कोरल्या गेल्यात हे त्याने पत्राद्वारे लिहिलयं.