'या' सेलिब्रिटींना देखील व्हर्चुअल गेम्सची भुरळ!

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रवासात खूप वेळ जातो. अशावेळी वेळ घालवण्यासाठी इंटरनेट कामी येते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 06:33 PM IST
'या' सेलिब्रिटींना देखील व्हर्चुअल गेम्सची भुरळ!

मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रवासात खूप वेळ जातो. अशावेळी वेळ घालवण्यासाठी इंटरनेट कामी येते.  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा अगदी व्हर्चुअल गेम्स हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. व्हर्चुअल गेम्स याचे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड आहे. मात्र ही कथा फक्त तुमची आमची नाही तर सेलिब्रिटींना देखील या गेम्सची भुरळ पडली आहे. 

ते सेलिब्रिटी आहेत शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा. आनंद एल राय यांच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी हे सगळे चालू आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’, ‘जब हॅरी मेट सेजल’नंतर हा या जोडीचा चौथा चित्रपट असेल. 

शूटिंगमधून वेळ मिळाला की हे दोन्ही कलाकार ल्युडो खेळत बसतात. याविषयी सेटवरील एका व्यक्तीने सांगितले की, "शाहरुखला गेम्सचे किती वेड आहे हे सर्वानाच माहित आहे. वेळ मिळताच तो त्याच्या डिजिटल डिव्हाइसवर गेम खेळत असतो. आता तर त्याला अनुष्का ही नवी गेम पार्टनर मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुख दोघांनाही ल्युडोने वेड लावले आहे. इतकेच नव्हे तर रायसुद्धा त्यांच्यासोबत गेम खेळत ब व्हर्चुअल गेम्स सतात. हा गेम खेळण्याचा जणू सेटवर संसर्गच झाला असल्याचे वाटते. कारण, क्रू मेंबर्सही आता शाहरुखला गेममध्ये साथ देऊ लागले आहेत."