सैफ अली खानच्या वाढदिवसाचे फोटो

१६ ऑगस्टला म्हणजे आज सैफ अली खानचा वाढदिवस साजरा झाला. आणि हा वाढदिवस एक दिवस अगोदरच म्हणजे १५ ऑगस्टच्या रात्रीपासूनच साजरा करायला सुरूवात झाली. सैफने आपल्या कुटुंबियांसोबत हा वाढदिवस साजरा करायला सुरूवात केली. 

Updated: Aug 16, 2017, 06:24 PM IST
सैफ अली खानच्या वाढदिवसाचे फोटो  title=

मुंबई : १६ ऑगस्टला म्हणजे आज सैफ अली खानचा वाढदिवस साजरा झाला. आणि हा वाढदिवस एक दिवस अगोदरच म्हणजे १५ ऑगस्टच्या रात्रीपासूनच साजरा करायला सुरूवात झाली. सैफने आपल्या कुटुंबियांसोबत हा वाढदिवस साजरा करायला सुरूवात केली. 

पत्नी करीना कपूर खान, मुलगी सारा अली खान, मुलगा इब्राहीम अली खान, बहिण सोहा अली खान, करिश्मा कपूर यावेळी उपस्थित होते. मात्र या वाढदिवसाला तैमूर कुठे दिसला नाही. करिश्मा कपूरने केक कटिंग सेरेमनीसोबत काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये बर्थ डे बॉय सैफ अली खान स्वतः खूप खूष असताना दिसला. 


करिश्माने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बहिणींच प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. 


तसेच सैफची बहिण सोहा अली खान गरोदर असल्याचं आपल्याला माहितच आहे. ती देखील या फोटोंमध्ये दिसत आहे. तिने ब्लू मॅक्सी परिधान केली आहे. आणि गरोदरपणाचा ग्लो अगदी तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 


असं देखील म्हटलं जातं की करिश्मा कपूरचा आताचा बॉयफ्रेंड संदीप तोषनीवाल देखील या पार्टीत उपस्थित आहे.