सैफच्या Kaalakaandi सिनेमाचं ट्रेलर लाँच

भारतात "ब्लॅक कॉमेडी" च्या जॉनरचे सिनेमे फार कमी होतात. मात्र 

Dakshata Thasale | Updated: Dec 7, 2017, 02:42 PM IST
सैफच्या  Kaalakaandi सिनेमाचं ट्रेलर लाँच

मुंबई : भारतात "ब्लॅक कॉमेडी" च्या जॉनरचे सिनेमे फार कमी होतात. मात्र 

'डेल्ही बेली' सिनेमाच्या सफलतेनंतर मेकर्सला यांचा अंदाज आला आहे की भारतातील प्रेक्षक ब्लॅक कॉमेडी पसंत करतात. आता हे मेकर्स डेल्ही बेलीच्या यशानंतर सैफ अली खानसोबत एक नवा सिनेमा घेऊन येत आहेत. 
त्याचं नाव आहे "कालाकांडी". या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

काय असणार या सिनेमांत?

या ट्रेलरची सुरूवात सैफकडून होती. ज्यामध्ये डॉक्टर त्याला सांगतात की, तुला पोटाचा कॅन्सर आहे. हे ऐकताच सैफ अतिशय घाबरतो. डॉक्टरला सांगतो की मी कधी सिगरेट देखील प्यायलो नाही मग मला हा आजार कसा झाला. यानंतर जगण्यात ३६० डिग्री बदल करण्यात सैफ कसा यशस्वी होतो हे या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 

कालाकांडीचा ट्रेलर अगदी स्पष्ट दाखवून देतो की, यामध्ये शिव्या, वाईट साईट बोलणं आणि सेक्स सारख्या गोष्टी असतात. ही सिनेमा ६ लोकांच्या अवती भवती फिरताना दिसतो. सैफसोबत या सिनेमांत मिस इंडियाची रनरअप असलेली शोभिता घूलीपाल पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या अगोदर शोभिता रणवीर सिंहसोबत एका कंडोम जाहिरातीमध्ये दिसली होती. या सिनेमाचा अंदाज भरपूर बोल्ड आहे.