सैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार

रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.

Updated: Jun 26, 2017, 04:02 PM IST
सैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार title=

मुंबई : सैराट सिनेमाची अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रथम श्रेणीत नुकतीच दहावी पास झाली आहे, रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.

कारण रिंकू पुण्यात पुढील शिक्षण घेणार आहे, आणि पुण्यात ६६.४० टक्क्यांवर हवं ते कॉलेज मिळणार नाही, रिंकू कोणत्या कॉलेजात प्रवेश घेणार आहे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. 

रिंकू मात्र आपलं महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करणार आहे आणि अभिनयावरही लक्ष केंद्रीत करणार आहे. रिंकूने पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात तिच्या करिअरच्या पुढील वाटचालीबद्दल ही माहिती दिली आहे. तर पाहु या रिंकू नेमकी कोणत्या कॉलेजात प्रवेश घेणार आहे.