सखी गोखलेचा नवा आणि हटके लूक

प्रत्येकाला आपल्या स्टाईलनुसार बदल करायला आवडतात. मग ते ड्रेसिंगमध्ये असो वा हेअरस्टाईलमध्ये. प्रत्येकजण यात काहीना काही बदल करत असतात. 

Updated: Jun 13, 2018, 05:35 PM IST
सखी गोखलेचा नवा आणि हटके लूक

मुंबई : प्रत्येकाला आपल्या स्टाईलनुसार बदल करायला आवडतात. मग ते ड्रेसिंगमध्ये असो वा हेअरस्टाईलमध्ये. प्रत्येकजण यात काहीना काही बदल करत असतात. टीव्ही स्टारही सतत हे असे बदल करत असतात. दिल दोस्ती दुनियादारी आणि दोबारा या मालिकांतून तरुणाईच्या मनावर राज्य करणारी रेश्मा अर्थात सखी गोखलेचा लूक पूर्णपणे बदललाय. तिने नवा लूक सोशल मीडियावर शेअर केलाय. 

सखीने तिचे लांबसडक केस कापलेत आणि नवा हेअरकट केलाय. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केलाय. सखी या नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. 

सखीने झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या मालिकेत काम केले होते. या दोन्ही मालिकेत तिची भूमिका परस्परविरोधी होती. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये तिने गावाकडून मुंबईत आलेल्या सोज्वळ रेश्माची भूमिका साकारली होती. तर दोबारामध्ये तिने मॉडर्न मुलीची भूमिका केली होती.

 

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close