स्विस रेडिओवर आदर्श शिंदे यांनी गायलेलं गाणं 'सभंळगं ढंभळंग' वाजणार

स्विस रेडिओच्या प्ले लिस्टवर हे पहिलं गाणं वाजणार असल्याचं या गाण्याच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे.

Updated: May 23, 2018, 01:30 PM IST

मुंबई : स्विस रेडिओच्या प्ले लिस्टवर हे पहिलं गाणं वाजणार असल्याचं या गाण्याच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे, जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्विस रेडिओवर हे गाणं वाजणार आहे. ‘संगळंग ढंभळंग’ हे गाणं स्विस रेडिओवर वाजणार आहे. गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. रिपब्लिक कलकुटाकडून हे गाणं त्यांच्या नॅशनल टेलिव्हीजन चॅनल आणि रेडियो स्टेशनच्या प्लेलिस्टमध्ये चालण्यासाठी मागवण्यात आलं आहे. असं आमंत्रणं मिळालेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे पहिलं मराठी गाणं असल्याचं सांगितलं जात आहे. रिपब्लिक कलकुटा हे स्वित्झर्लंडमधले प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेडियो स्टेशन आहे.यावर देश-विदेशांतली निवडक गाणी वाजवली जातात. संभळंग ढंभळंगला हा मान मिळणं, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.