PHOTO : शेअर करताच वायरल झाले टीव्हीच्या 'नागिन'चे हे फोटो...

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Updated: Feb 9, 2018, 05:27 PM IST
PHOTO : शेअर करताच वायरल झाले टीव्हीच्या 'नागिन'चे हे फोटो...

मुंबई : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

टीव्ही सीरियल 'नागिन'मधून लोकांची मनं जिंकणाऱ्या मौनी रॉय सतत चर्चेत असते. इतरांना ज्या ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते ठिकाण मौनीनं सहज गाठलंय. 

मौनी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवरही खूपच अॅक्टिव्ह दिसते. तिचे अनेक मोहक-मादक फोटो इन्स्टाग्रामवर दिसतील. आता मौनीनं आपले आणखी काही हॉट फोटो इन्स्टावर शेअर केलेत. 

एका फोटोत मौनीनं सफेद रंगाचा लेहंगा-चोली परिधान केलंय... तर आणखी एका फोटोत तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. या फोटोला मौनीनं कॅप्शन दिलंय 'रॅन्डम आर्ट'

love-less-ness

A post shared by mon (@imouniroy) on

लवकरच मौनी अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचं शुटिंगही सुरू झालंय. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर ती आणखी एका सिनेमात दिसणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत मौनी 'ब्रह्मास्र' या सिनेमात दिसणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close