असे एकत्र दिसले शाहरुख - काजोल, चाहत्यांनी केल्या कमेंट्स

'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभागी झाले होते. यामध्ये, शाहरुख खान आणि काजोल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 12, 2017, 01:50 PM IST
 असे एकत्र दिसले शाहरुख - काजोल, चाहत्यांनी केल्या कमेंट्स title=

नवी दिल्ली : 'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभागी झाले होते. यामध्ये, शाहरुख खान आणि काजोल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या दोघांना या महोत्सवात एकत्र पाहिले गेले. एकमेकांशी गप्पा मारत महोत्सवाचा आनंद घेताना दिसत होते. त्यावळचे काही फोटोस सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहेत.

 शाहरुख आणि काजोल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत मंचावर दिसले. हलक्या फुलक्या गप्पा मारत दोघांनीही वेळेचा आनंद घेतला. शाहरुख आणि काजोल व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, महेश भट्ट, कमल हसन याव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड चेहरे यावेळी दिसत होते. 

शाहरुख आणि काजोलच्या मैत्री एव्हाना सर्वांना परिचित अशी आहे.

या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या दोघांना अनेक दिवसांनी एका स्टेजवर पाहिल्यावर त्यांच्या फॅन्सनाही आनंद अनावर झाला होता.

त्यामूळे शाहरुख आणि काजोलचे चाहते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसले. 

 

 शाहरुख आणि काजोल हे 'दिलवाले' या चित्रपटात शेवटच्या वेळी एकत्र दिसले होते.

हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता, ज्याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.