शाहिदला 'किस' करताना मीरा झाली ट्रोल

युझर्सने म्हटलं,  दिवाळी आहे, हनीमून नाही... 

शाहिदला 'किस' करताना मीरा झाली ट्रोल

मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिवाळी सणानिमित्त मीराने शाहिद आणि तिचा एकत्र फोटो शेअर केला. हा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि अवघ्या काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर मीरा ट्रोल झाली. 

शेअर केलेल्या या फोटोमध्ये शाहिद आणि मीरा एकमेकांना किस करताना दिसत आहे. फक्त प्रेम.... दिवाळीच्या शुभेच्छा... अशी पोस्ट टाकत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मीरा - शाहिद खूप क्यूट दिसत असले तरीही हे ट्रोल झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Only love Happy Diwali!

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

या फोटोखाली अनेक युझर्सने कमेंट केली आहे. एक युझरने मीरा म्हटलं की, या फोटोतून कळतंय तू खरंच छोट्या शहरातून आली आहे. ही दिवाळी आहे हनिमून नाही... तर दुसऱ्या युझर्सने म्हटलं की, तुझ्यासारख्या महिलांना भारतीय संस्कृतीबद्दल काहीच माहित नाही. तुला हे देखील माहित नाही की, सोशल मीडिया कसं वापरतात.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close