मीरामुळे शाहीद पद्मावतदरम्यान राहत होता हॉटेलमध्ये

लग्नानंतर शाहीद कपूर अनेकदा आपली रिअल लाईफ पद्मावती अर्थात मीरा राजपूतसोबत दिसतात. अनेकदा दोघं हातात हात घातलेले दिसतात.

Updated: Mar 21, 2018, 02:52 PM IST
मीरामुळे शाहीद पद्मावतदरम्यान राहत होता हॉटेलमध्ये title=

मुंबई : लग्नानंतर शाहीद कपूर अनेकदा आपली रिअल लाईफ पद्मावती अर्थात मीरा राजपूतसोबत दिसतात. अनेकदा दोघं हातात हात घातलेले दिसतात.

नुकताच काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये मीराने शाहीदबाबतचा एक खुलासा केला. पद्मावत सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहीद घरी येऊ नये असे मीराला वाटत होते. 

ही जोडी करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण च्या पाचव्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा ही जोडी नेहा धुपियाच्या बीएफएफ विद वोग या कार्यक्रमात दिसणार आहे. 

या शोमध्ये बोलताना मीराने हा खुलासा केला. पद्मावतच्या शूटिंगदरम्यान त्याने घरीच येऊ नये असे मला वाटत होते. शाहीद सकाळी आठ वाजता घरी परतत असे त्यानंतर दुपारी दोन वाजता उठायचा. तो रात्रभर मेहनत करत असल्याने त्याला शांती हवी असे. मात्र मीशा त्याला खूप त्रास द्यायची. तिला त्याच्यासोबत मस्ती करायला हवी होती. यावेळी शाहीद काही बोलायचा नाही. मात्र मला समजत होते. तो रात्रभर शूटिंगमुळे दमायचा. त्यामुळे झोप आवश्यक आहे. त्यामुळए मी शाहिदला सांगितले बस आता पुरे झाले. ्