ट्रोल झाल्यानंतर सुहाना खान करतेय 'हे' काम

पाहा हे खास फोटो 

ट्रोल झाल्यानंतर सुहाना खान करतेय 'हे' काम  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आपल्या स्टाईल, हॉली डे आणि फोटोमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी Vogue मॅगझीनच्या शूटमुळे सुहाना खान खूप चर्चेत आली होती. अगदी सोशल मीडियावर ती ट्रोल देखील झाली होती. 18 वर्षाची ही सुहाना आपल्या मित्रांसोबत वेनिसमध्ये सुट्या घालवत आहे. इंस्टाग्रामवर सुहानाच्या फॅनपेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  

suhana khan holidaying in venice

या हॉली डेच्या अगोदर खान फॅमिली सुट्यांवर गेल्याचं लक्षात आलं होतं. या सुट्टीत सुहानासोबत दोन्ही भाऊ आर्यन आणि अबराम तसेच शाहरूख - गौरी देखील होते. खान फॅमिलीच्या सुट्यांचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. 

suhana khan holidaying in venice with friends

सुहानाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वोग मॅगझीनच्या कव्हर फोटोच्या शूटवेळी तिला भरपूर मजा आली. जेव्हा तिला डान्स करायचा होता तो भाग खूप मजेशीर असल्याचं म्हटलं होतं. मला डान्स करायला भरपूर आवडतो. मला खूप आनंद आहे की, माझे पालक हा प्रोजेक्ट माझ्याकडे घेऊन आले. 

Photos of suhana khan holidaying in venice

सुहाना यावेळी इंग्लडमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. तर शाहरूख खानचा मुलगा आणि सुहानाचा भाऊ आर्यन यावेळी लॉस एंजलिसमध्ये फिल्ममेकिंगच शिक्षण घेत आहे. सुहाना आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉस एंजिलसमध्ये आपल्या भावासोबत अभिनयाचा शॉर्ट कोर्स करत आहे. 

Photos of suhana khan for vogue Shoot

आपल्या अभिनय करिअरबद्दल सुहाना म्हणते की, मी याच्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. मी हळूहळू या क्षेत्राकडे वळली आहे. मात्र माझ्या आई वडिलांना याची जाणीव झाली की मी परफॉर्मन्स चांगला करत आहे.